कोपरगाव – ग्रामीण मधील दोनही संशयिताचे अहवाल निगेटीव्ह
Featured

कोपरगाव – ग्रामीण मधील दोनही संशयिताचे अहवाल निगेटीव्ह

Sarvmat Digital

कोपरगाव – तालुक्यातील ग्रामीण भागातील दोन गावामधील दोन जणाना मंगळवारी तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविले होते.त्या दोघांचीही कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष विधाते यांनी दिली आहे.

यातील एक जण माहेगाव देशमुख येथील तर दुसरे रुग्ण करंजी येथील होते.या दोघांचे अहवाल तपासणीसाठी पाठविल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होतो कि काय अशी भिती नागरीकामध्ये तयार झाली होती मात्र हे दोन्हीही अहवाल निगोटीव्ह आल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नागरीकांनी काही अंशी दिलासा मिळाला आहे.

शेजारच्या येवला व सिन्नर मध्ये रुग्ण असल्याने अगोदरच कोपरगावच्या नागरिकांची चिंता वाढली आहे . कोपरगावमधील कोरोना झालेल्या महिलेचे निधन झाल्यानंतर चेक केलेले आजपर्यंतचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत अहवाल जरी निगेटीव्ह आले असले तरी तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.गरजेशिवाय बाहेर पडने परवडणारे नाही.सोशियल डिस्टशं पाळणेही महत्वाचे आहे.तसेच मास्क किवा रुमालाचा वापर आवश्य करावा. शहराबरोबरच ग्रामीण भागातही जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.या दोघांना दिसणाऱ्या लक्षणावरून त्यांना तपासणीसाठी पाठवले होते.

Deshdoot
www.deshdoot.com