नगर – सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर
Featured

नगर – सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर

Sarvmat Digital

अहमदनगर – जिल्ह्यात आणखी करोनाच्या १२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड-१९ टेस्ट लॅबच्या अहवालात १२ व्यक्तींचे अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. आज दिवसभरात १८ व्यक्ती करोना बाधित आढळून आले आहे.

यात राहाता येथील २९ वर्षीय युवक, नगर शहरातील माळीवाडा येथील एकाच कुटुंबातील ०४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय, मार्केट यार्ड येथील ३७ वर्षीय महिला व लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाचा यात समावेश आहे. तसेच शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील ६० वर्षीय व्यक्ती भांडूप (मुंबई) येथून शेवगाव येथे आलेल्या ५५ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिलेलाचा समावेश आहे. तसेच मुंबई येथून पाथर्डी येथे आलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण करोना बाधीतांचि संख्या १९५ वर गेली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com