जिल्ह्यात दहावीसाठी 76 तर बारावीसाठी 67 हजार परीक्षार्थी
Featured

जिल्ह्यात दहावीसाठी 76 तर बारावीसाठी 67 हजार परीक्षार्थी

Sarvmat Digital

बोर्ड सचिवांच्या उपस्थितीत नगरमध्ये मंगळवारी नियोजन बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी)- 18 फेबु्रवारीपासून बारावीची तर 3 मार्चपासून दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी 4 तारखेला नगरमध्ये बोर्डाचे सचिव यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील परीक्षा केंद्र चालक आणि परीक्षक यांची बैठक होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांनी दिली. दरम्यान यंदा जिल्ह्यातून दहावीसाठी 76 हजार 221 तर बारावीसाठी 66 हजार 908 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दहावी आणि बारावीची नगर ग्रामीण 3182 (1667), अकोले 5244 (3794), जामखेड 2569 (3344), कर्जत 3612 (3550), कोपरगाव 5486 (4586), नेवासा 7111 (4029), पाथर्डी 4697 (6247), राहुरी 4263 (2924), संगमनेर 8100 (6966), शेवगाव 4794 (4723), श्रीगोंदा 4629 (3091), श्रीरामपूर 5450 (2378), राहाता 5500 (4660), नगर शहर 7534 (9506) असे आहेत.

गणित, इंग्रजीच्या पेपरला बैठे पथक
दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान गणित आणि इंग्रजीच्या पेपरला बैठे पथक तैनात करण्यात येणार आहे. यासह दोन पेपरला संवेदनशील केंंद्राचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेचा कालावधी हा 23 दिवसांचा तर दहावीच्या पेपरचा कालवधी 17 दिवसांचा राहणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com