दहा वर्षांत तीन कोटी वाहने वाढली
Featured

दहा वर्षांत तीन कोटी वाहने वाढली

Sarvmat Digital

संगमनेर (वार्ताहर)- राज्यात दरवर्षीच मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या सुमारे तीन कोटी पाच लाखाहून अधिक वाढल्याचे चित्र आहे. तर मागील एका वर्षात सुमारे 23 लाख वाहने रस्त्यावर आली आहे. ही वाढणारी संख्या राज्याच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम करेल असे चित्र आहे.

राज्यात लोकसंख्येचा विचार करतात दर एक लाख लोकसंख्येमागे सुमारे 30 लाख 398 इतके वाहने रस्त्यावर येत आहेत. 1971 साली राज्यात अवघी 3 लाख 11 हजार 690 वाहने होती. 50 वर्षात ही संख्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ लागली आहे. एक लाख लोकसंख्येमागे 50 वर्षापूर्वी अवघी 618 संख्या होती.

राज्यात सध्या सर्वाधिक वाहने मोटरसायकल स्कूटर व मोपेड आहेत. ती संख्या दोन कोटी 72 लाख 48 हजार 417 इतकी आहेत. त्याखालोखाल 10 लाख 34 हजार 488 स्वयंचलित रिक्षांचे प्रमाण आहेत. मोटारगाड्या जीप आणि वॅगन्स ही संख्या 51 लाख 56 हजार 660 आहे. टॅक्सीची संख्या तीन लाख 66 हजार 309 तर स्टेज कॅरेज संख्या 26 हजार 586 आहे कॉन्ट्रॅक्टर कॅरेजेस वाहनांची संख्या 72 हजार 794 आहे. डिझेल इंजिन वरती असणारी मालमोटारी संख्या 70 लाख 50 हजार 680 तर सीएनजी वरती असणारी संख्या 76 हजार 948 आहे.

पर्यावरणाला धोका
राज्यात इतक्या वेगानं वाहनांची संख्या रस्त्यावरती येत आहेत. त्यामुळे वाहनांद्वारे बाहेर पडणारे वायुमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो आहे. राज्यात वाहनातून बाहेर पडणार्‍या वायूमुळे पर्यावरण धोकादायक बनत आहे. दोन महिने लॉकडाऊन असल्यामुळे व वाहने रस्त्यावर येत नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यात वातावरणातील विषारी वायूचे प्रमाण कमी होऊन प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे.

लाख लोकसंख्येमागे 14 रुग्णवाहिका
राज्यात सध्या एकूण उपलब्ध असणार्‍या रुग्णांची संख्या अवघ्या 16534 इतकी आहे. हे प्रमाण दर लाख लोकसंख्येमागे केवळ 14 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. शाळेच्या बसेस संख्या 29 हजार 539 इतकी आहे. खाजगी प्रवासी वाहनांची संख्या 12725 पासून शेतकर्‍यांसाठी उपयोगी ठरणार्‍या ट्रॅक्टरची संख्या आठ लाख 9 हजार 177 इतकी आहे. ट्रेलरची संख्या 4 लाख 21 हजार 311 असून इतर वाहनांची संख्या 76 हजार 551 इतकी आहे.

गॅसवरच्या मालमोटारी सर्वात कमी
राज्यात उपलब्ध असलेल्या एकूण मालमोटारीची संख्या लक्षात घेता त्यातील 76 हजार 948 इतकीच वाहने हे सीएनजी, एलपीजी गॅस वरती चालणारी आहेत. तर सर्वाधिक वाहने डिझेल इंजिन वरची असून ती संख्या 70 लाख 50 हजार 680, तर पेट्रोल इंजिन वरची संख्या 11 हजार 831 इतकी आहे. त्याचबरोबर विद्युतचा उपयोग करून चालणार्‍या मोटारींची संख्या 309 आहे.

Deshdoot
www.deshdoot.com