भुसावळ : किराणा व्यवसायिकावर चाकूहल्ला
Featured

भुसावळ : किराणा व्यवसायिकावर चाकूहल्ला

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

येथील जामनेर रोडवरली किराणा व्यवसायिक राजकुमार आगीचा यांच्यावर तसलिम शेख उर्फ काल्या याने शहरातील लेंडी नाला परिसरात धारदार चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना दि. 22 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

घटनेनंतर जखमी व्यापार्‍याला तात्काळ महामार्गावरील गोदावरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत व्यापारी राजकुमार आगीचा यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात आरोपी विरुद्ध भा.दं.वि.307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरा पर्यंत सुरु होते. तपास पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. जयराम खोडपे करित आहे.

Deshdoot
www.deshdoot.com