खरीप पीक विमा योजनेसाठी 500 कोटींची रक्कम
Featured

खरीप पीक विमा योजनेसाठी 500 कोटींची रक्कम

Dhananjay Shinde

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा
अहमदनगर (प्रतिनिधी)  – नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पीकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली. खरीप हंगाम सन 2019 साठी राज्य शासनाच्या हिश्याची पिक विमा हप्ता अनुदानापोटी 500 कोटी रूपये इतकी रक्कम वितरीत करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे विमा उतरविलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2019 मध्ये राज्यात शासन निर्णयाद्वारे भारतीय कृृषि विमा कंपनी आणि बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी या दोन विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. त्यांना पिक विमा हप्ता अनुदानापोटी पुरक मागणीद्वारे उपलब्ध असलेल्या निधीतून राज्य शासन हिश्याची रक्कम 500 कोटी रक्कम वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी खरीप पीक विमा योजनेत भाग घेतला होता. यावर्षी अतिवृष्टी आणि पूर यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने मदत जाहीर केली होती. पण ज्यांनी विमा उतरविला ते शेतकरी मदतीपासून वंचित होते. पण आता राज्य सरकारने त्यांच्या हिश्श्याची 500 कोटींची रक्कम अदा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com