साराशी ब्रेकअप, आता करिनासोबत फ्लर्ट करतोय कार्तिक
Featured

साराशी ब्रेकअप, आता करिनासोबत फ्लर्ट करतोय कार्तिक

Sarvmat Digital

मुंबई – दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या लव आज कल 2 सिनेमाच्या चित्रीकरणाच्या सुरुवातीला सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता ही जोडी तुटली असून दोघांचं ब्रेकअप झालं आहे. आता कार्तिक अनन्या पांडेसोबत असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. असं असलं तरी नुकताच कार्तिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

या व्हिडिओमध्ये कार्तिक चक्क करिना कपूर खानशी फ्लर्ट करताना दिसत आहे. करिना कपूर खानच्या व्हॉट वूमन वॉन्ट शोच्या नव्या भागात कार्तिक आर्यन गेला होता. यावेळी करिनाने कपल गोल्ससाठी कोणती जोडी सर्वोत्तम आहे असा प्रश्न विचारला. कार्तिक सैफ आणि करिनाचं नाव घेणार होता इतक्यात करिनानेच त्याला त्याला सैफ- करिना सोडून दुसर्‍या जोडीचं नाव घ्यायला सांगितलं.

तिच्या या बोलण्यानंतर कार्तिक थोडा विचार करू लागला आणि म्हणाला, पण तू लग्न का केलं… कार्तिकचं हे वाक्य ऐकताच करिना लाजली आणि म्हणाली की, तू फार बदमाश आहेस

Deshdoot
www.deshdoot.com