शिर्डी संस्थानच्या 635 कर्मचार्‍यांना कायम करावे
Featured

शिर्डी संस्थानच्या 635 कर्मचार्‍यांना कायम करावे

Sarvmat Digital

माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांची मागणी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- 2001 ते 2004 पर्यंत साई संस्थानमध्ये इनसोर्स 635 कंत्राटी कर्मचार्‍यांना माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने संस्थान कंत्राटी पदावर नियुक्ती करण्यासंबंधात निर्णय घेतला असून सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अधीन राहून सर्वच्या सर्व 635 कामगारांना क़ायम करावे, अशी मागणी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केली.

2001 पूर्वी साईबाबा संस्थान सेवेत असलेल्या 1052 कंत्राटी कामगारांना तत्कालीन विधी व न्याय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार संस्थान सेवेत क़ायम करण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी काही कंत्राटी कर्मच्यार्‍यांच्या ड्यूटी कमी असलेल्या कारणामुळे वगळले होते. त्यावेळी त्यांना पुढीलवेळी क़ायम करण्याचा शब्द संस्थान प्रशासनाने दिला होता. 2004 पर्यंत रुजू झालेल्या सुमारे 635 कंत्राटी कर्मचार्‍यांना संस्थान सेवेत घेण्याबाबत तत्कालीन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला फडणवीस सरकारने मान्यता देत त्यासंबधी जीआरही काढला होता.

राज्य सरकारने काढलेल्या जीआर प्रमाने सर्वच्या सर्व 635 कंत्राटी कर्मच्यार्‍यांना कायम करण्याबाबत साईसंस्थानने निर्णय करण्याची गरज आहे. मात्र काही कर्मच्यांर्‍यांच्या ड्युटी कमी भरत असल्याच्या कारणामुळे क़ायम करण्यास संस्थान प्रशासन टाळाटाळ करत आहे. साईसंस्थान प्रशासनाने राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्वच्या सर्व 635 कर्मचार्‍यांना क़ायम करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन कैलासबापू कोते यांनी केले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्मचार्‍यांच्या या प्रश्नात जातीने लक्ष घालून तत्कालीन मुख्यमंत्र्याकडून मान्य करून घेतला आणि या कर्मच्यार्‍यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्याचे काम केले असल्याचे कैलास कोते यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com