जपानी लोकांचे आयुमार्न जास्त का असते ?
Featured

जपानी लोकांचे आयुमार्न जास्त का असते ?

Sarvmat Digital

जपानी लोकांनी हाराकिरी म्हणजे आत्महत्या केली नाही तर ते चांगले दीर्घायुष्य जगतात हा आजपर्यंतचा अनुभव आहे. दीर्घायुष्यासाठी योग्य आहारविहार असणे आवश्यक असते. जगातील अन्य देशांच्या तुलनेत जपानी लोक अधिक निरोगी असतात. ते आपल्या आहाराबाबत अत्यंत जागरुक असतात. हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे.

जपान असा देश आहे जिथे पुरुष सर्वसाधारणपणे 80 वर्षे वयापर्यंत जगातात तर महिला 86 व्या वयापर्यंत जगातत. याचाच अर्थ जपानी लोक जगातील इतरांच्या तुलनेत अधिक जगतात.

याचे रहस्य त्यांच्या संतुलित आहारात आहे. जपानी लोक भाज्या खूप खातात. त्यांच्या थाळीत अर्ध्याहून अधिक भाग हिरव्या भाज्यांचा असतो. याशिवाय विविध डाळींचे ते सेवन करतात.

जपानी लोक दिवसातून किमान दोन कप ग्रीन टी घेतात. त्यांच्या नाश्त्यामध्येच ग्रीन टी, स्टीम राईस, टोफूसह मिसो सूप, हिरवा कांदा, ऑम्लेट आणि माशाच्या तुकड्याचा समावेश असतो. जपानी लोकांना सागरी खाद्य अतिशय आवडते. चिकन, मटणापेक्षा ते सागरी मासे अधिक प्राधान्याने खातात. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार जपानमध्ये दरवर्षी एक लाख टन सी फूडची विक्री होती.

Deshdoot
www.deshdoot.com