Thursday, April 25, 2024
Homeनगरजनार्दन स्वामींनी श्रमाचे महत्त्व पटवून दिले

जनार्दन स्वामींनी श्रमाचे महत्त्व पटवून दिले

मोहनराव चव्हाण : पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची सांगता

कोपरगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे दिव्य चरित्र व दिव्य कार्य सर्वांना परिचित आहे. ते शिवयोगी साक्षात्कारी सत्पुरुष होते. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि विशुद्ध प्रेम, पवित्र त्यांच्या चराचरात भरलेले आहे. श्रमदानातून सत्कार्य करताना त्यांनी समाजाला श्रमाचे महत्त्व पटवून दिले. जनार्दन स्वामींच्या सहवासाचे परमभाग्य आपणा सर्वांना लाभले हे भाग्यगोदयाचे लक्षण आहे असे प्रतिपादन आश्रमाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांनी केले.

- Advertisement -

जनार्दन स्वामींच्या 30 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सोमवारी सात दिवसांपासून सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची सांगता समाधी मंदिर स्थानावर करण्यात आली. सोमवारी पहाटे नित्यनियम विधी पठण, सत्संग, प्रवचन, आरती, भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिरावर आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वर येथील शिखरे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली बाबाजींची पाद्यपूजा, समाधी महापूजन, आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. प्रारंभी जनार्दन स्वामी आश्रम यांच्यावतीने सर्व विश्वस्तांनी उपस्थितांचे स्वागत केले.

मोहनराव चव्हाण पुढे म्हणाले की, जनार्दन स्वामी यांनी श्रमदानाबरोबर व्यसनमुक्ती वृक्षारोपण आदी संस्कार दिले. जनार्दन स्वामी आश्रमाने पहिली ते बारावीपर्यंत संस्कृत शिक्षण देणारी शाळा काढून मोठे राष्ट्रकार्य केले आहे. व समाजाचेही त्यात मोठे योगदान आहे. स्वामी दैवी मूल्यांचे निष्काम कर्मयोगी होते अशा संतांची सेवा घडावी हे भाग्योदय याचे लक्षण आहे. आश्रमाच्यावतीने विविध समाजकार्य याबाबतची माहिती या वेळी देण्यात आली.

याप्रसंगी संत रमेशगिरी, माधवगिरी, मधुगिरी, भाऊ पाटील यांची प्रवचने झाली. मधुगिरी महाराज म्हणाले की, जीवनात सुख पाहिजे असल्यास संत चरणात ते पहावे. तर माधव गिरी महाराज म्हणाले की, सदगुरूंची ओळख दिव्यत्वाच्या दर्शनात होते. मानवाच्या जीवनात संत मनोरथ पूर्ण करणारे आहे. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने, भाजपा तालुका अध्यक्ष शरद थोरात, उपाध्यक्ष अंबादास अंत्रे, विश्वस्त अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, सुभाष शिंदे , संदीप चव्हाण, मंगेश पाटील, विलास कोते, यादवराव कोते, माधवराव पाटील, रामकृष्ण कोकाटे, रामानंद महाराज, यांच्यासह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात जनार्दन स्वामी भक्त परिवार, महिला उपस्थित होत्या. नाशिक, मालेगाव ,सातपूर, एरंडगाव आदी ठिकाणाहून जनार्दन स्वामींच्या दिंड्या येथे आल्या होत्या. जनार्दन स्वामी समाधी मंदिर ते जुनी गंगा परिसरात मोठी यात्रा भरली होती. जनार्दन स्वामी भक्तांना यावेळी तालुक्यातील विविध शाळांच्या मुलांनी चाळीस हजार लिटर आमटी व विविध गावातून आलेल्या भाकरीचा महाप्रसाद वितरित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या