Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
Featured

तळोद्यातील कुटुंबीय लग्नाचा बस्ता फाडण्यासाठी अहमदाबादला गेले,लॉकडाऊनमुळे तिथेच अडकले

Balvant Gaikwad

उद्या होणारा विवाह रद्द; नवरी अहमदाबादलाच राहिली

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. संचारबंदी लागू असून सिमाबंद करण्यात आली आहे. देशच नव्हे तर संपूर्ण जग जिथे काही कालावधीसाठी थांबले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जिथे आहे तिथेच थांबा’ असे जनतेला केलेल्या आवाहनामुळे अमळनेर येथील नवरदेव, तर तळोदा येथील नवरी यांचा विवाह सोहळा दि.16 एप्रील 2020 रोजी तळोदा येथे पार पडणार होता. या विवाह सोहळ्याची तयारीसाठी नवरीकडचे कुंटूबीय नवरीसह अहमदाबाद येथे बस्ता फाडण्यासाठी 18 मार्चला गेले असता लॉकडाऊनमुळे तिथेच अडकल्याने विवाह सोहळा तर रद्द झालाच, मात्र 10 कुटूंबिय अडकून पडल्याने त्यांना गावाकडे येण्याचा कल लागला असून एका महिलेची तब्येत बिघडली असल्याने त्यांना कसे तरी तळोदा येथे आणण्यासाठी कुंटूबाचा प्रयत्न सुरू आहे.कसेही करा, आम्हाला येथून बाहेर काढा असे अनुभवकथन कुटूंबीय करीत आहे.

कंजरभाट समाजातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील बिनाबाई टिळंगे यांचा मुलगा अनिल याची मुलगी प्रार्थना टिळंगे हिचा विवाह अमळनेर येथील शशिकांत बागडे यांचा मुलगा आकाश यांचा विवाह दि.16 एप्रील 2020 रोजी होणार होता. यानिमित्त नवरीचे कुटुंबीय नवरीसह कपडे घेण्यासाठी (बस्ता) अहदाबाद येथे दि.18 मार्चला गेले होते. मात्र 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यु’ चे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने ते तिथेच अडकले. त्यानंतर 21 दिवसाचा आता 3 मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढल्याने 10जण गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील छारानगर, कुबेरनगर, पाटीया येथे अडकले आहे.

महिलेची तब्येत बिघडली
तळोदा येथील बिनाबाई टिळंगे यांची तब्येत बिघडली असून त्यांना नंदुरबार येथे आणण्यासाठी लोकप्रतिनिधीसह, समाजसेवक तसेच नंदुरबार जिल्हाप्रशासनाने प्रयत्न करून मला कसेही करा पण अहदाबादमधून नंदुरबारला पाहेचवा असे त्यांनी देशदूत शी बोलतांना सांगितले.

विवाह रद्दमुळे आर्थिक नुकसान
येत्या 16 एप्रील रोजी आकाश बागडे याचा विवाहनिमित्त लग्नपत्रिका, बॅन्डपथक,पंडीत, जेवणाची व्यवस्था, लग्नमंडप, व्हिडीयो शुटींग, फोटोग्राफी,यासह लग्नसोेहळ्यात लागणारे वस्तुची अडव्हान्स बुकींग करून ठेवली होती मात्र लॉकडाऊनमुळे सर्व रद्द केल्यामुळे हातमजुरी करून उदरनिर्वाह करून लग्नासाठी जमापुंजी केली होती ते आर्थिक नुकसान सहन कराव लागत आहे.
-दिनेश शशिकांत बागडे, अमळनेर

Deshdoot
www.deshdoot.com