Tuesday, April 23, 2024
Homeशब्दगंध‘नमस्कार’ करा, ‘कोरोना’ टाळा

‘नमस्कार’ करा, ‘कोरोना’ टाळा

भारतीय संस्कृतीचा सातासमुद्रापार वाजला डंका

प्रासंगिक – दि.१५ मार्च २०२०
राजेंद्र पाटील
जळगाव : शब्दगंध

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुध्दा व्हाईट हाऊसमध्ये हस्तांदोलनाने नाही तर चक्क भारतीय पध्दतीने (दोन्ही हात जोडून) नमस्कार करून अतिथींचे स्वागत केले. डोनाल्ड ट्रम्प हे काही दिवसांपूर्वीच भारतभेटीवर आले होते. त्यांनी येथील भारतीय संस्कृतीचे जवळून दर्शन घेतले व ती त्यांना खुप आवडली. भारतीय संस्कृतीत दोन्ही हात जोडून, वाकून नमस्कार केला जातो हे त्यांना पसंत आले. त्यातच सध्या जगभरात कोरोनाची दहशत पसरली असल्याने प्रत्येकजण आपापल्या बचावासाठी प्रयत्न करत असून हस्तांदोलन, गळाभेट हे सर्व टाळून दूरूनच नमस्कार करताना दिसत आहेत.

बालसंस्कार मार्गदर्शनाने घडतेय आदर्श पिढी

- Advertisement -

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. संतांचे विचार समाजाला सद्विवेक देतात आणि हाच विचार प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे महान कार्य डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान श्रीबैठकीच्या माध्यमातून श्रवणभक्तीच्या माध्यमातून करत आहे. माणसाचे जीवन हे झाडासारखे असते म्हणून बीज अंकुरताना त्याची उत्तम संगोपनाने काळजी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे माणसाच्या बाल्यावस्थेत जर उत्तम बालसंस्काराचे संगोपन केले तर संस्कारक्षम आदर्श पिढीची, समाजाची निर्मिती होईल अशी शिकवण श्रवणातून दिली जाते. श्रीबैठकीला जाणारा प्रत्येक श्रीसदस्य दोन्ही हात जोडूनच एकमेकांना नमस्कार करत असतो. एवढेच नव्हे तर बालभक्तीला जाणारे लहान बालकं सुध्दा हात जोडूनच नमस्कार करतात, हा चांगल्या संस्कारांचाच परिणाम आहे. लहान बालकांवर भक्तीचे संस्कार व्हायला हवेत, त्यातूनच संस्कारक्षम तरूणपिढी घडेल व ही संस्कारक्षम पिढी संस्कृती टिकवेल यात शंका नाही.

भारतीय संस्कृतीचे महत्व महान आहे हे आता संपूर्ण जगाला समजून चुकले आहे. भारतीय संस्कृतीत ‘नमस्कार’ करण्याला अनन्य साधारण महत्व आहे. सध्या जगभरात करोना विषाणूमीळे धुमाकूळ घातला आहे. आता तर भारतातही ‘करोना’चा संसर्ग वाढत असून त्याचा शिरकाव महाराष्ट्रातही झाला आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आता डॉक्टर हातात हात न घेता दूरूनच ‘हात जोडून नमस्कार’ करण्याचा सल्ला देत आहेत. याची प्रचिती अमेरीकेतही पहावयास मिळाली. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी भारत दौर्‍यानंतर मायदेशी परतल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये येणार्‍या अतिथींचे स्वागत हस्तांदोलन न करता हात जोडून ‘नमस्कार’ करून करत आहेत. यावरून भारतीय संस्कृतीचे महत्व जगातील सर्वच देश अंगीकारू लागले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

जगभरात सदस्यस्थितीत ‘कोरोना’ने थैमान घातले आहे. चिनमध्ये उगमपावलेला ‘कोरोना’व्हायरसचे विषाणू जगभरात पसरू लागले अहेत. हा आजार हवेतून नाही तर संसर्गातून पसरत असल्याचे आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय नागरीक अंमलात आणत आहेत. यात प्रामुख्याने नागरिक हातात हात मिळविण्याऐवजी हात जोडून एकमेकांना नमस्कार करताना दिसत आहेत जेणेकरून कोरोनापासून बचाव होईल, आणि ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच आहे. कारण आपण आपण आपले हात कितीही स्वच्छ धुतले असले तरी समोरच्या व्यक्तीचे जर हात खराब असतील तर त्या हातांची घाण आपल्या हातांना लागणारच यात शंका नाही. त्यामुळे हात जोडून नमस्कार करणे केव्हाही योग्यच आहे.

लहानपणापासूनच आपल्याला एकमेकांना भेटल्यानंतर ‘नमस्कार’ करण्याची सवय लावली जाते, आजकाल हात मिळवणे, गळाभेट घेणे आदी पध्दतीच्या पाश्चात्य संस्कृतीतील पध्दतींचा अवलंब केला जातो. मात्र ‘जूनं तेच सोनं’ असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण हात जोडून नमस्कार करण्याचे आरोग्यदायी महत्व मोलाचे आहे हे कोरोनामुळे आता सर्वांनाच हळू हळू पटू लागले आहे. भारतीय संस्कृतीतील अभिवादन ‘नमस्कार’ करण्याची परंपरा जगाने अवलंबली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा ‘जन औषधी’ दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधताना सांगितले होते.

सद्यस्थितीत ‘करोना’वर ठोस उपाययोजना नसली तरी काळजी घेणे हाच महत्वाचा उपाय आहे. याबाबत शासन, सामाजिक, राजकीय स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. यात कोरोनाचे विषाणू संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क, रूमाल बांधणे, खोकताना, शिंकताना रूमाल लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे किंवा खबरदारी घेणे यासह एकमेकांशी जवळून बोलताना हस्तांदोलन न करता ‘नमस्कार’ करूनच स्वागत केले पाहीजे, हे भारतवासियांना सांगण्याची गरज नाही आणि प्रत्येक सुजान नागरिकांसाठी पटवून देण्याचीही आवश्यकता भासू नये.

सद्यस्थितीत सर्वत्र साक्षरतेचे प्रमाण दिवसागणीक वाढत आहे. मात्र अनेकजण जसजशी प्रगती करत आहे, भौतीक सुविधा वाढत चालल्या आहेत तसा तो भारतीय संस्कृती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब करताना दिसून येतात. आजकाल समाजात बदलत्या रूढी, परंपरांना विसरून अधिकाधिक पाश्चिमात्य संस्कृतीचा वापर होताना दिसत आहे. याचे होणारे दुष्परिणामांची जाणीव मात्र आता होऊ लागली आहे. भारतभूमीला साधू-संतांची परंपरा आहे ती जगात अन्य कोणत्याही देशात नाही.

नमस्कार आपल्याला खूप काही शिकवतो. आई-वडील, गुरूजन, वडीलधारी व्यक्ती यांना वाकून नमस्कार करणे ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. एवढेच नाही तर नमस्कार आपल्याला नम्रता शिकवतो. नम्रता हा मोठा सद्गुण असून तो आजकाल कमीच झालेला दिसून येतो. संत शिकवणीनुसार जीवनात नम्रता महत्वाची आहे. कोणापुढे तरी आपल्याला वाकता आले पाहिजे, नम्र होता आले पाहिजे. काही काळापुरता का होईना आपल्यातील अहंकार, ताठा बाजूला ठेवता आला पाहिजे.

पूर्वी बर्‍याच मंदिरांचे दरवाजे खुपच कमी उंचीचे असत. यामगील हेतूच असा होता की, मंदिरात जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीला नम्र होऊन जा, वाकून जा अशी शिकवण देत होता. कारण एखादा माणूस सर्वगुण संपन्न असेल पण त्याच्यात नम्रता नसेल तर त्या गुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाला अपुरेपण म्हणता येईल. आज आपण सभोवार पाहिलं तर शिक्षण, सत्ता, पैसा, बुद्धिमत्ता या कशाचा ना कशाचा अहंकार बहुतेकांमध्ये आढळून येतो. म्हणून अभिमान असावा पण दुरभिमान असू नये. ईश्वरानं प्रत्येकाला काही ना काही शक्ती दिलेली असून तीचा उपयोग दुसर्‍यांच्या कल्याणासाठी कसा करता येईल? समाजातील दु:खितांसाठी, अडल्या-नडल्यांसाठी काय करता येईल? याचा मनापासून विचार होण गरजेचे आहे. मात्र मनुष्य आज विसरतो की, सत्ता असो वा पैसा, या गोष्टी कायमस्वरूपी राहणार्‍या नाहीत. सत्ता आणि लक्ष्मी या खूप चंचल आहेत.

मो.९४०३५६६३८१

- Advertisment -

ताज्या बातम्या