पहूर-शेंदूर्णी रस्त्यावर मोटरसायकल पिकअपची धडक ; मोटरसायकलस्वार जागीच ठार
Featured

पहूर-शेंदूर्णी रस्त्यावर मोटरसायकल पिकअपची धडक ; मोटरसायकलस्वार जागीच ठार

Balvant Gaikwad

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) –

पहुर-शेंदूर्णी मार्गावर घोडेस्वार बाबा दरगाह जवळ मोटरसायकल व पिक अप यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दि.८ रोजी दूपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, महादेव बांबरुड तालुका पाचोरा येथील अनिल चत्तरसिंग गजरे (भोई) (वय 45) हा व्यक्ती पहूर पासून जवळ असलेल्या शेरी धरणातील मासे आपल्या गावी घेऊन जात असतांना घोडेस्वार बाबा दरगाह जवळ वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या पिकअप बोलेरो (एम.एच.43 ऐडी 8255) या मालवाहतूक गाडीने मोटरसायकलला (एम.एच.19 ए.एम.2456) जोरदार धडक दिल्याने अनील गजरे हा जागीच ठार झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण बर्गे, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, जितेंद्र परदेशी, अनिल राठोड, ईश्वर देशमुख यांनी घटनास्थळी येऊन मयतास पहूर ग्रामीण रूग्णालयात हलविले.
मयत अनील गजरे यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, असा परिवार असून पहूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पहूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com