लॉकडाऊनमध्ये मुलांना ऑनलाइन शिक्षण

लॉकडाऊनमध्ये मुलांना ऑनलाइन शिक्षण

जळगाव जिल्ह्यातील अनेक शाळांनी सुरु केला उपक्रम

कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. लॉकडाऊनमुळे शिक्षण कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे. शाळांना सुट्या जाहीर झाल्या आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा पुढील वर्षांत प्रवेश दिला गेला. आता या नवीन शैक्षणिक वर्षाला अनेक शाळांनी ऑनलाईन, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे तर महाविद्यालय व विद्यापीठाकडून ऑनलाईन शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकजण घरी बसून कंटाळले आहेत. या रिकाम्या वेळेचा सदुपयोग व्हावा तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही चिंता पालकांसह शिक्षकांनाही सतावत आहे. घरबसल्या काही हटके शिकण्याची इच्छा आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप तसेच शैक्षणिक अ‍ॅपची निर्मिती करून ऑनलाईन विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाचे धडे दिले जात आहे.

जिल्ह्यातील इंग्लिश मीडियम स्कूल, सीबीएसई स्कूलसह जि.प.शाळा यांच्यासह अनेक शाळेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवणे, गृहपाठ तसेच सराव पुस्तिका तपासणे, यासह विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करणे, रोज विविध प्रकारच्या गोष्टी, व्यायामाचे फायदे, कागदापासून विविध गोष्टी तयार करणे यासह नवीन वस्तू तयार करण्यास शिकविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन सराव

16 मार्चपासून शाळा बंद असून दृकश्राव्य माध्यमातून संपर्कात राहून 80 टक्के विद्यार्थ्यांचा अभ्यास व परीक्षेचा सराव करून घेतला आहे. शाळेत हुडको परिसरातील विद्यार्थी
असल्यामुळे ऑनलाइन येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास व्हिडिओ बनवून त्यांना पाठविण्यात येतो. यासाठी शिक्षक पंकज सोनगिरे यांचे सहकार्य लाभत आहे.
– सोनल यादव, मुख्याध्यापिका, अरुणोदय प्राथमिक शाळा, जळगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com