आरके वाईनपाठोपाठ नशिराबादच्या क्रिश ट्रेडर्सचाही परवाना रद्द

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव – 

लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले होते. असे असूनही लॉकडाऊन कालावधीमध्ये मे. क्रिश ट्रेडर्स, एफएल-1, अनुज्ञप्ती क्र. 12, नशिराबाद, ता. जि. जळगाव या अनुज्ञप्तीमधून विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 56 (1) (ब) अन्वये प्राप्त अधिकारानुसार त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला असून तसे आदेश निर्गमित केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनुज्ञप्तीधारक राजकुमार शितलदास नोतवाणी व भागीदार अनिता शिरिष चौधरी यांचेकडून जिल्हाधिकारी, जळगाव यांचे आदेश क्रमांक सीएलआर, एफएलआर-112020/आव्य/ दि. 21 व 31 मार्च, 2020, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, मुंबई विदेशी मद्द नियम, 1953 चे नियम 10 (1) (ब), 15, 16, 21 (3) (ब), 21 (5) 22 तसेच एफएल-1 अनुज्ञप्ती शर्त क्रमांक 2 व 7, महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवह्या इत्यादि) नियम 1969 चे नियम 9 व 14 (1) या नियमांचा भंग केला.

म्हणून नशिराबाद येथील मे. क्रिश ट्रेडर्स यांचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याचे जळगाव राज्य उत्पादन शुल्कचे नितीन धार्मिक यांनी दिले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *