जिल्ह्यातील गिरणा खोरे समृद्धीचा मार्ग मोकळा; खासदार उन्मेष पाटील यांची माहिती
Featured

जिल्ह्यातील गिरणा खोरे समृद्धीचा मार्ग मोकळा; खासदार उन्मेष पाटील यांची माहिती

Balvant Gaikwad

जळगाव । श.प्र.

खान्देशच्या सिचन क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारा आणि शेतकरी बांधवांच्या जिव्हाळाचा प्रश्न असलेल्या सात बलून बंधार्‍यांना लवकरच मान्यता प्रदान करण्यात यावी यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी गेल्या पंधरवाड्यात केंद्रीय जलशक्ती  मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत यांची दिल्ली येथे भेट घेतली होती तर नुकतीच जल आयोगाचे अध्यक्ष आर के जैन, जलशक्ति प्रधान सचिव यू पी सिंग यांच्याकडे केलेल्या भक्कम पाठपुराव्याला यश मिळणार असून येत्या सप्ताहात ही मंजुरी मिळून गिरणा खोरे समृद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज व्यक्त केली आहे.

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव यासह अर्धा जिल्हास सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी संजीवनी ठरणार असलेल्या  प्रस्तावित सात बलून बंधार्‍यांच्या मंजुरीसाठी जलशक्ति मंत्री ना. गजेंद्र शेखावत,जलशक्ति मंत्रालयाचे प्रधान सचिव यू पी सिंग तसेच जल आयोगाचे अध्यक्ष आर के जैन यांच्याकडे सर्व पातळीवर पाठपुरावा करण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून गेल्या अडीच वर्ष्याच्या मेहनतीला फळ मिळणार आहे .

ना.नितीन गडकरी आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सात बलून बंधारे प्रस्तावास हिरवा कंदील मिळाला असून देशातील पहिला उबेर नेट गेट अर्थात रबर युक्त बलून बंधारे प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या पंधरवाड्यात जलशक्ति मंत्री गजेद्र शेखावत यांच्याशी या विषयांवर खासदार उन्मेष पाटील यांनी चर्चा केली असून या विषयाची माहिती दिली होती.खासदार उन्मेश दादा पाटील यांनी  सात बलून बंधार्‍यांची आवश्यकता मंत्री महोदयांना विशद केली होती .येत्या पंधरवड्यात तात्काळ सात बलून बंधार्‍यांना प्राधान्याने मान्यता प्रदान करण्याचे केंद्रीय मंत्री शेखावत आशवस्त देखील केले होते.खासदार उन्मेष पाटील यांनी *सात बलून बंधारे पूर्ण करणेसाठी मी कंबर कसली असून या बंधार्‍यामुळे खान्देश मध्ये जलक्रांती होईल.तसेच हा सर्व परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल. कोणत्याही परिस्थितीत देशात पथदर्शी असलेला हा सात  बलून बंधारे प्रकल्प पूर्ण करून गिरणा खोरे समृद्ध करणार असल्याची ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील  यांनी व्यक्त केली आहे.

-देशात पथदर्शी सात बलून बंधारे

मेहूणबारे, बहाळ (वाडे), पांढरद, भडगाव, परधाडे, माहिजी, कानळदा या ठिकाणी हे बंधारे प्रस्तावित असून यामध्ये साचणारे पाणी : 25.28 दशलक्ष घनमीटर इतक्या क्षमतेने साचणार असून यासाठी सुमारे अपेक्षित खर्च  841 कोटी,15 लाख येणार आहे. हा खर्च नीती आयोगाच्या डिमांड 48 या शिर्षकाअंतर्गत  तरतुदी मुळे  निधी मिळणार आहे या बंधार्‍यामुळे एकूण  4489 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. जिल्ह्यातून वाहणार्‍या गिरणा नदीतील पाणी बंधारे नसल्याने वाहून जाते. त्यामुळे गिरणा धरणापासून पुढील बाजूस असलेल्या नदीवर सात बलून बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागासमोर खासदार उन्मेश पाटील आमदार असताना यापूर्वीच ठेवण्यात आलेला होता यामुळे नदीतून वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com