अपहरण प्रकरणी पीडितेची सुटका, दोघं संशयित अटकेत
Featured

अपहरण प्रकरणी पीडितेची सुटका, दोघं संशयित अटकेत

Balvant Gaikwad

जळगाव | प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील दिंडोशी येथून अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करणार्‍या तरुणासह त्याच्या महिला साथीदारास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांना रात्री ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केले.

दिंडोशी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यासह अफजल ऊर्फ असगर असलम खान, पीडिता आणि फरजाना मोहम्मद असलम (वय २२, रा.दिंडोशी) असे तिघेही भोकर येथील एका शेतात आश्रय घेवून थांबले होते.

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या पथकाने इम्रानअली सय्यद, गोविंदा पाटील यांच्या पथकाने भोकर येथील शेतातून पीडितेसह दोघं संशयिताना ताब्यात घेतले. त्यांना तपासकामी ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com