video बी.यू.एन.रायसोनी शाळेत विज्ञान प्रदर्शन
Featured

video बी.यू.एन.रायसोनी शाळेत विज्ञान प्रदर्शन

Balvant Gaikwad

जळगाव । प्रतिनिधी

येथील बी.यू.एन.रायसोनी शाळेत उत्तमचंद नेमीचंद रायसोनी यांच्या पुण्यतिथी निमित्त दि.14 फेब्रुवारी रोजी रांगोळी, चित्रकला, क्राफ्ट, विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रथम उपस्थित मान्यवरांनी स्व.भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी इंग्रजी व मराठी माध्यमच्या शिशुविहार विभागातील चिमुकल्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

सौ.सुप्रिया पाटील यांनी भाऊसाहेबांच्या जिवनकार्याबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी सुध्दा मनोगत व्यक्त करून श्रध्दांजली वाहीली. इंग्रजी माध्यमाने स्व.भाऊसाहेबांच्या जीवनावरील सचित्र माहिती पीपीटी द्वारे प्रदर्शीत केली.

या कार्यक्रमाला शाळेचे संस्थाध्यक्ष शिरीष रायसोनी, उमेद रायसोनी, सौ.ममता रायसोनी, सौ.पल्लवी रायसोनी व भाऊसाहेबांच्या सुकन्या, दोन्ही विभागाचे पालक संघ पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ.नलीनी शर्मा, विठ्ठल पाटील, चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com