चोपडा-नाशिक बस अपघाताची माहिती खोटी-आगार प्रमुख श्री.क्षिरसागर
Featured

चोपडा-नाशिक बस अपघाताची माहिती खोटी-आगार प्रमुख श्री.क्षिरसागर

Balvant Gaikwad

राजेंद्र पाटील

‘चाळीसगाव फाट्यावर अ‍ॅक्टीडंट झाला आहे, आता आत्ताच चोपडा ते नाशिक बस आणि ट्रक, बसने ट्रकला धडक दिली’ याप्रकारचा मेसेज व अपघाताची व्हीडीओ क्लीप सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या प्रकारचा मेसेच वाचून व व्हीडीओ बघून कोणत्याही व्यक्तीस घाम फुटेल असा तो अपघाताचा व्हीडीओ आहे.
या व्हीडीओ क्लीपमध्ये 18-20 जणांचा अपघात झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे, त्यात खान्देशी मराठी भाषेचा वापर झाला असून तो अपघात आताचा नसून (जुना कुठेतरी झालेला) आहे. मात्र सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होणारी ही फेक न्यूज चिंतेचा विषय ठरत आहे.
व्हायरल व्हीडिओमागच सत्य जाणण्याचा प्रयत्न
खरी माहिती गोळा करण, चुकीची माहिती बाजूला सारण आणि सत्य जगासमोर आणणे हे पत्रकारांच कामच आहे. चोपडा-नाशिक बसचा चाळीसगाव फाट्याजवळ अपघात झाल्याचा मेसेज, व्हीडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वत्र जोरदार फिरत आहे. एखादी बातमी, एखाद्या प्रसिध्द व्यीक्तीने केलेलं विधान किंवा एखादा व्हायरल मेसेज खरा की खोटा याची पडताळणी करणे गरजेचे आहे मात्र असे न करता आपल्याला आलेला मेसेज अनेक लोक मागचा पुढचा काहीएक विचार न करता क्षणार्धात इतरांना फारवर्ड करत असतात.

मात्र जागृत व्यक्ती असे करत नसतो तो बातमीची सहानिशा नक्कीच करतो, याचप्रमाणे आमच्या देशदूतमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले गौरव वाघ यांनी सदर अपघाताचा मेसेज खरा आहे का? यासाठी तत्काळ संपादकीय विभागाशी संपर्क साधवला. जागृत नागरीक असे काही खोटे वाटणार्‍या मेसेजवर विश्वास न ठेवता त्याबाबत एखाद्या विश्वासार्ह वृत्तपत्रात त्याविषयी काही बातमी आली आहे का? हे बघतो.
कुठलीही माहिती मिळाल्यावर पत्रकार त्या माहितीचा स्त्रोत काय आहे याचा तपास करतात. किंवा त्यातील संबंधीतापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतात.

‘अपघात खरा की खोटा’ हे सत्य पडताळून पाहण्यासाठी आम्ही चोपडा एस.टी.आगार प्रमुख संदेश क्षिरसागर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या मेसेजमुळे आम्ही सुध्दा घाबरलो, आमच्या चालक-वहकांच्या परिवारातील सदस्य चिंतेत सापडले, अनेकांनी याबाबत भ्रमणध्वनीवरून विचारणा केली.

तरी याकडे दुर्लक्ष न करता चोपडा आगारातून नाशिककडे रवाना झालेल्या सर्व एस.टी.चालक, वाहकांशी संपर्क साधून माहिती घेतली असता असा प्रकार कोठेही झालेला नाही सोशल मिडीयावरील माहिती खोटी असून तो जुना व्हीडीओ व्हायरल होत आहे. यावर कुणीही विश्वास ठेवू नका व अशा प्रकारचा खोटा मेसेज कुणाला पाठवू नका यामुळे एखाद्यावेळेच खर्‍या माहितीवरही विश्वास बसणार नाही अशी माहिती आगारप्रमुखांनी दिली.
व्हायरल फोटो, व्हिडीओवर लगेच विश्वास ठेवू नका
एखादी बातमी अगदीच अविश्वसनीय वाटत असेल तर ती आधी तपासून पहिली पाहिजे. बर्‍याचदा अशा गोष्टी खोट्या असतात. आलेला संदेश खरा आहे की खोटा खात्री वाटत नसेल तर ऑनलाईन विश्वासार्ह वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर जाऊन याविषयी माहिती मिळते का ते पहा. तुम्ही अजूनही साशंक असाल तर याविषयी ज्या व्यक्तींना खरोखर माहिती असेल अशा व्यक्तींना नक्कीच विचारा.

Deshdoot
www.deshdoot.com