Featured

जळगाव : भाजप जिल्हा बैठकीत धक्काबुक्की; भुसावळचे सुनील नेवे यांच्यावर शाईफेक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव –

भाजपा जिल्हाध्यक्ष निवड बैठकीत भुसावळचे भाजपाचे पदाधिकारी सुनील नेवे यांचावर शाई फेक व धक्काबुक्कीचा प्रकार संतप्त भाजपा कार्यकर्ते यांच्याकडून झाला. या अचानक घडलेल्या प्रकाराने बैठकीत गोंधळ उडाला.

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करून परिस्थिती हाताळली.

बैठकी साठी आलेले रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्या अंगावर हि शाई उडाली.

घडलेल्या प्रकाराने रावसाहेब दानवे बैठकीतुन निघून गेले.

भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांचे समर्थक म्हणून सुनील नेवे ओळखले जातात, अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com