जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दोन युवकांवर हल्ला
Featured

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दोन युवकांवर हल्ला

Balvant Gaikwad

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा उपकारागृहासमोरील धान्याच्या गोडावून समोरील रस्त्यावर कारमधून उतरलेल्या तीन ते चार अज्ञात तरुणांनी दोन युवकांवर धारदार शस्त्राने सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वार केला. हा प्राणघातक हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येते.

या हल्ल्यात फौजी ऊर्फ सनी जाधव (रामेश्‍वर कॉलनी) व रणजित कोळी (जैनाबाद) हे जखमी झाले आहेत. याबाबत कळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तो पर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.

पोलिसांनी जखमी दोघं तरुणांना तत्काळ  डॉ.उल्हास पाटील  वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. जखमी झालेले दोघं तरुण कारागृहातील एका कैद्याला भेटायला आले होते. त्यानंतर पूर्ववैमनस्यातून हा वाद उफाळल्याचे सांगण्यात येते.

Deshdoot
www.deshdoot.com