जळगाव : भाऊंच्या उद्यानात भरणार ‘आर्ट मेला’
Featured

जळगाव : भाऊंच्या उद्यानात भरणार ‘आर्ट मेला’

Rajendra Patil

अनुभूती निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्र, शिल्पांचे प्रदर्शन

अनुभूती निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून सर्जनशिलता या विविधांगी उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थी वर्षभरात कलेचे विविध प्रकार अभ्यासत असतात.

चित्रकला, शिल्पकला, विणकाम, पॉट्री (मातीकाम) या कलांचा अभ्यास करून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असेलला ‘आर्ट मेला’ दि.१४ व १५ मार्च २०२० असे दोन दिवस भाऊंच्या उद्यानात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

या आर्ट मेळ्याचे उद्घाटन जळगाव शहरातील प्रसिद्ध चित्रकार सचिन मुसळे यांच्या हस्ते व अतुल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१४ मार्च शनिवारी सायं ६ वा. होणार आहे.

भाऊंच्या उद्यानातील आर्ट गॅलरीत अनुभूती निवासी शाळेतील इ. 5 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतींचे त्यात पेंटीग, पॉट, विणकाम व बाटीककाम यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

तसेच उद्यानातील एम्पी थिएटर मध्ये उद्घाटनानंतर सायं.६.३० वा.सांगितीक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले असून गाणी व तबला वादनाचे सादरीकरण विद्यार्थी करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थितीचे आवाहन संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य जे.पी.राव यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com