Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशजागतिक आरोग्य संघटनेत भारताला मानाचे स्थान

जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मानाचे स्थान

सार्वमत

नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मानाचे स्थान देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 22 मे पासून डॉ. हर्षवर्धन आपला पदभार सांभाळणार असून त्यांच्याकडे संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत.

- Advertisement -

सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झाले. 194 देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षर्‍याही केल्या आहेत. तसेच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारताची नियुक्ती केली जाईल, असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहाने सर्वांच्या संमतीने घेतला होता. हे पूर्णवेळ कामकाज नाही. परंतु, डॉ. हर्षवर्धन यांना कार्यकाळी मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी राहण्याची आवश्यकता असेल, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या