भारत-चीन सीमावादात ट्रम्प यांची मध्यस्थीची तयारी
Featured

भारत-चीन सीमावादात ट्रम्प यांची मध्यस्थीची तयारी

Dhananjay Shinde

सार्वमत

नवी दिल्ली – लडाख सीमारेषेपलीकडून चीनकडून सुरु असलेल्या कुरापतींमुळे भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच सीमावादात आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली आहे. सीमाप्रश्नी दोन्ही देशांमध्ये समेट घडवण्याची आमची इच्छा आहे. अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून मध्यस्थीची तयारी दर्शविली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,सीमा प्रश्नी भारत-चीनमध्ये मध्यस्थी करण्यास आम्ही तयार आहोत. दोन्ही देशांना तसे कळवले आहे.
लडाखमधल्या वेगवेगळया भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य तैनात झाले असून दीर्घकाळ ही संघर्षाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर सीमा भागामध्ये सुरु असलेली विकासकामे कुठल्याही परिस्थितीत थांबवायची नाहीत, हा निर्धार करण्यात आला आहे. चीनची दादागिरी सहन करणार नाही, हे भारताने डोकलाम संघर्षाच्यावेळीच दाखवून दिले होते. त्यामुळे आता लडाखमध्येही दीर्घकाळ तणावाची स्थिती राहू शकते, त्यासाठी भारतही पूर्णपणे सज्ज आहे.

Deshdoot
www.deshdoot.com