एकमेकांच्या प्रेमात मग्न सारा – कार्तिक
Featured

एकमेकांच्या प्रेमात मग्न सारा – कार्तिक

Sarvmat Digital

मुंबई – अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन त्यांच्या नात्यामुळे कायम चर्चेत असतात. त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून त्यांच्या बहुचर्चित लव आज कल चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. कधी सेटमधील फोटो व्हिडिओ तर कधी त्यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगलेली असेत.

या चित्रपटाच्या माध्यमातून सारा – कार्तिकला एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चाहत्यांची ही उत्सुकता काही दिवसांनी संपणार आहे. कारण आता लवकरच या दोघांना रूपेरी पडद्यावर एकत्र पाहता येणार आहे. नुकताच चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये दोघे एकमेंकांच्या प्रेमात मग्न झालेले दिसत आहेत.

चित्रपटाचा हा पोस्टर चात्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. पोस्टरमध्ये कार्तिक प्रती साराचं असलेलं प्रेम स्पष्टपणे झळकत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com