कंगना सीएसएमटीच्या तिकीट काउंटरवर
Featured

कंगना सीएसएमटीच्या तिकीट काउंटरवर

Sarvmat Digital

मुंबई- नेहमी वादाच्या भोवर्‍यात असणारी अभिनेत्री कंगना रानौत सोमवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चाहत्यांमध्ये आनंदात दिसली. तिच्या हसण्यामागे कारण देखील खास होत. तिचा पंगा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

त्यामुळे ती चित्रपटाच्या प्रमोशन साठी एकापेक्षा एक शक्कल लढवताना दिसत आहे. पंगा या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती चक्क लोकल ट्रेनचं तिकिट देताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती घेत असलेला मपंगाफ चाहत्यांना पसंतीस पडतो की नाही हे पाहणं मजेशीर असणार आहे.

एक पत्नी, आई, मुलगी आणि मैत्रीण म्हणून कंगनाने तिच्या वाट्याला आलेली भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहता येता आहे. जेसी गिल या चित्रपटातून तिच्या पतीच्या तर, अभिनेत्री नीना गुप्ता या तिच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com