टायगर श्रॉफच्या अ‍ॅब्जवर फिदा झाली दिशा पाटणी
Featured

टायगर श्रॉफच्या अ‍ॅब्जवर फिदा झाली दिशा पाटणी

Sarvmat Digital

मुंबई – टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा अनेक वषारपासून आहेत. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची कबूली दिली नाही. असं असलं तरी टायगर आणि दिशा आठवड्यातून एकदा तरी एकत्र लंच किंवा डिनर करतात. काही दिवसांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं. पण यात तथ्य नसल्याचं नंतर कळलं. दरम्यान, टायगरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. त्या फोटोवर दिशाने कमेन्ट केली आहे.

बॉलिवूड फोटोग्राफर डब्बू रत्नानेच्या कॅलेन्डर 2020 साठी टायगरने शूट केलं होतं. याच कॅलेन्डरचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत त्याने शर्टाचे बटण न लावता अ‍ॅब्ज फ्लॉन्ट केले. या फोटोत टायगर सॅक्सी दिसत आहे यात काही शंका नाही. टायगर श्रॉफचा हा फोटो पाहून दिशाही स्वत…ला कमेन्ट करण्यापासून रोखू शकली नाही. दिशाने टायगरच्या फोटोवर आगीचं इमोजी टाकत कमेन्ट केली. या इमोजीचा अर्थ तो फार हॉट दिसत आहे असा होता. फे दिशानेच नाही तर तिच्या बहिणीने खुशबूनेही टायगरच्या या फोटोवर कमेन्ट केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com