‘मी त्याला रंगेहात पकडलं आणि माफ देखील केलं’
Featured

‘मी त्याला रंगेहात पकडलं आणि माफ देखील केलं’

Sarvmat Digital

मुंबई-  मी त्याला रंगेहात पकडलं शिवाय त्याला दुसरी संधी देखील दिली. करण मी त्याच्या प्रेमात फार आंधळी होती. त्याने केलेल्या विनविणीनंतर मी त्याला माफही केलं. नुकताच झालेल्या एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणने लग्नाआधीच्या प्रेमाबाबत भाष्य केलं. या सर्व गोष्टींमधून बाहेर येण्यास मला खूप वेळ लागला असं देखील ती यावेळेस म्हणाली.

या मुलाखती दरम्यान कोणाचंही नाव न घेता तिने तिच्या नातेसंबधांविषयी अनेक रहस्यांचा उलगडा केला. माझ्यासाठी शारीरिक संबंध म्हणजे केवळ जवळीक नसून त्यात भावना आहेत. मी कधीही कोणापासून काही लपवले नाही किंवा कोणाला फसवले नाही. जर नात्यामध्ये कोणी माझी फसवणूक करत असेल तर मी त्या नात्यात का असावं ? असं दीपिका म्हणाली.

Deshdoot
www.deshdoot.com