83 : दीपिका पादुकोणचा फर्स्ट
Featured

83 : दीपिका पादुकोणचा फर्स्ट

Sarvmat Digital

मुंबई – रणवीर सिंहचा बहुचर्चिच चित्रपट 83 मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण माजी क्रिकेटर कपिल देव यांची पत्नी रूमी देव यांच्या भूमिकेत आहे. ट्रेड नालिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवर दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंहचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यामध्ये दीपिका पादुकोण शॉर्ट हेअरमध्ये दिसत आहे. आणि ती कपिल देव यांची भूमिका साकारलेल्या रणवीर सिंहच्या हातात हात घालून उभी असलेली दिसत आहे.

फर्स्ट लूकमध्ये दीपिका पादुकोण ब्लॅक कलरच्या हाय नेकसोबत बेज कलरच्या स्कर्टमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये रणवीर सिंह-दीपिका पादुकोण पटकन ओळखत नाहीत. माजी क्रिकेटर आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन कपिल देव यांचे म्हणणे आहे की, सुरुवातीला त्यांना वाटत होते की, त्यांच्यावर कुठलाही चित्रपट बनू नये. ते म्हणाले होते की, जेव्हा पहिल्यांदा मला या चित्रपटाविषयी विचारण्यात आले होते, तेव्हा मी नकार दिला होता.

मला वाटत होतं की, असा कुठलाही चित्रपट येऊ नये. मग, जेव्हा चित्रपट निर्माता कबीर सिंह यांनी संपूर्ण कहाणीची चर्चा केली तेव्हा माझ्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. आणि मी होकार दिला.

Deshdoot
www.deshdoot.com