श्रीगोंदा : चार ग्रामपंचायतींची सरपंच पदासह निवडणूक
Featured

श्रीगोंदा : चार ग्रामपंचायतींची सरपंच पदासह निवडणूक

Sarvmat Digital

21 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक; लोणी व्यंकनाथ, टाकळी लोणारच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील मांडवगण, महंडूळवाडी, भावडी, कोकणगाव या चार गावांच्या सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे. लोणी व्यंकनाथ आणि टाकळी लोणार गावच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक आणि इतर 21 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहेत. यासाठी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली होती.

तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून दोन गावांचे सरपंच आणि 21 गावांच्या ग्रामपंचायत सदस्यांचे रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. यात महांडूळवाडी ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी चार अर्ज तर सात सदस्य पदासाठी 44 अर्ज दाखल झाले आहेत. भावडीच्या सरपंच पदासाठी 6 अर्ज तर सात सदस्य पदासाठी 23 अर्ज दाखल झाले.

कोकणगावच्या सरपंच पदासाठी सहा अर्ज सात जागांच्यासाठी 34 अर्ज दाखल झाले. मांडवगणच्या सरपंच पदासाठी 9 अर्ज दाखल झाले. यात सरपंच पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून यात सविता घोडके, सविता लोखंडे, आशा लोखंडे, सुनंदा लोखंडे, सुलभा सदाफुले, वंदना शिंदे, बेबी लोखण्डे, अर्चना चव्हाण यांचे अर्ज आहेत.

तर लोणीच्या सरपंच पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत 5 अर्ज दाखल झाले असून यात रामदास ठोंबरे, स्वप्निल गायकवाड, अक्षय गायकवाड, रामदास ठोंबरे, संतोष माने यांचे अर्ज आले आहेत. टाकळी लोणारच्या सरपंच पदासाठी आठ अर्ज दाखल आहेत तर 21 ग्रामपंचायतींच्या एक दोन रिक्त जागांसाठी अर्ज दाखल झाले असून यातील गव्हाणेवाडी, हिंगणी दुमाला, बाबुर्डी, एरंडोली, पिसोरेखांड गावच्या एक एक सदस्यांच्या जागा बिनविरोध झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com