आठ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; वृद्धाला अटक
Featured

आठ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; वृद्धाला अटक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षाच्या बालिकेवर एका 60 वर्षीय वृध्दाने अत्याचार केला. याबाबत एका 60 वर्षीय वृद्धास बालिकेच्या पालकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हद्दीतील परिसरात रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.

ही बालिका कुत्र्याच्या पिल्लांसोबत अंगणात खेळत होती. त्या परिसरातील रवींद्र पुना रंधे (वय 60) याने त्या बालिकेला गोड बोलून घरात बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर त्या मुलीला त्रास सहन होत नव्हता. तिने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल आजीला सांगितले.

यासंदर्भात आजीने बालिकेला विचारणा केली असता तिने वृद्धाच्या गैरकृत्याबाबत सांगितले. त्यानंतर पालकांनी त्याला पकडून जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार रवींद्र पुना रंधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या वृद्धाने दारुच्या नशेत अत्याचार केल्याचा आरोप बालिकेच्या नातेवाईकांनी केला आहे. या बालिकेला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ करीत आहे. बालिका व आरोपीचे कुटुंबीय मोलमजुरी करणारे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com