OLYMPUS DIGITAL CAMERA
OLYMPUS DIGITAL CAMERA
Featured

ग्राहकांना मिळणार मोफत वीज?

Dhananjay Shinde

मुंबई – राज्यातलं ठाकरे सरकार दिल्लीतल्या केजरीवाल सरकारच्या पावलावर पाऊल टाकत वीज ग्राहकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. विजेचा दरमहा 100 युनिटपर्यंत वापर करणार्‍या ग्राहकांना मोफत वीज देण्याचा राज्य सरकारचा विचार सुरु आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली असून त्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्याचंही सांगितलं.

दिल्लीतल्या केजरीवाल सरकारनं प्रतिमहिना 200 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या ग्राहकांना निवडणुकीच्या तोंडावर मोफत वीज देण्याचा निर्णय घेत केजरीवाल सरकारनं दिल्लीकरांना मोठं गिफ्ट दिलं होतं. जे ग्राहक 200 युनिटपर्यंत विजेचा वापर करतात त्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आप सरकारनं घेतला. शिवाय 201 ते 400 युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांना वीज बिलावर 50 टक्के अनुदान दिलं जातं. हे अनुदान बिलाच्या रकमेवर नाही तर वीज वापराच्या युनिटवर दिलं जातं. म्हणजे एखाद्या ग्राहकानं 300 युनिट वीज वापरली तर ग्राहकाला 150 युनिटसाठीच पैसे मोजावे लागतात.

त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळतोय. तोच कित्ता महाराष्ट्रात गिरवण्याचा ठाकरे सरकारचा मानस आहे. राज्य सरकार 200 युनिटपर्यंत वीजेचा वापर करणार्‍या ग्राहकांना मोफत वीज देण्याचीही चाचपणी करत आहे. पण त्याआधी किमान 100 युनिटपर्यंतच्या ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद आवश्यक आहे. त्यामुळेच सरकारनं महावितरणसह तिन्ही वीज कंपन्यांना खर्चात कपात करण्याचे निर्देष देण्यात आलेत.

एम.एच.17 बीडब्लू 8460 च्या डिक्कीत ठेवले. व पंधरा हजार रुपये बसस्थानक जवळ असलेल्या नेवासा फाटा रस्त्यावरील कृषी केंद्र येथे द्यायचे असल्याने ते पैसे वर खिशात ठेवले होते. सदर कृषी केंद्र येथे जाऊन नळघे यांनी पैसे दिले. त्यानंतर इतरांना पैसे द्यायचे असल्याने नळघे हे गाडीकडे गेले असता त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांना डिक्कीचे कुलूप तोडून डिक्कीमध्ये असलेले सुमारे चार लाख रुपये घेवून पोबारा केला.
याप्रकरणी आसाराम यादव नळघे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदर घटनेनंतर पोलीस निरीक्षक रणजित डेरे व पथकाने तत्काळ शहरातील रस्त्यावरील दुकानामधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, मात्र चोरटे सापडले नाही. पुढील तपास हेड कोन्स्टेबल विठ्ठल गायकवाड हे करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com