माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी
Featured

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

Sarvmat Digital

नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरुन आलेल्या या धमकीनंतर गौतम गंभीर याने दिल्ली पोलीसांत तक्रार दाख़ल केली आहे. तसेच गंभीर याने त्यांची आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षा सुनिश्चित करण्याची देखील मागणी केली आहे.

गंभीर यांनी दिल्लीतल्या शाहद्रा शहराच्या पोलीस उपायुक्तांना पत्र लिहून या घटनेची तक्रार केली आहे. त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, मला आणि माझ्या परिवारातील सदस्यांना आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरुन सातत्याने हत्येच्या धमक्या येत आहेत. तुम्ही कृपया या प्रकरणात लक्ष घालून एफआयआर दाखल करुन घ्या. तसेच मला आणि माझ्या परिवाराला सुरक्षा प्रदान करा.असे त्याने म्हटले आहे.

गौतम गंभीर हा पूर्व दिल्ली मतदारसंघाचे खासदार आहे. सातत्याने देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्वतःचे मत मांडत असतो.

Deshdoot
www.deshdoot.com