Blog : सायकलचा ‘नवतरुण’ फंडा
Featured

Blog : सायकलचा ‘नवतरुण’ फंडा

Sarvmat Digital

आसपास जन्मलेल्या बहुतेक सर्वांना या सायकलचा सहवास लाभला आहे. सायकलविषयी वाटणारा जिव्हाळा आणि यदाकदाचित ती सायकल हरवली किंवा चोरीला गेली, तर त्याचे किती दु:ख होते, याचीही काहींना जाणीव असेल. आता आपल्याकडे दुचाकी गाडी नक्कीच असेल, चारचाकीही आली असेल.. पण एखादी सायकल नक्कीच असेल.. आता या सायकलची चोरी होऊ शकणार नाही.. कारण, तंत्रज्ञानच असे विकसित करण्यात आले आहे.

चिली या देशामध्ये तीन तरुण इंजिनिअर्सने सायकलची चोरी रोखण्यासाठी एक शक्कल लढवली आहे. याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे सायकलच्या सीटद्वारे लॉक करायचे किंवा हँडलद्वारे. या सायकलचे सीट हेच लॉक म्हणून वापरता येऊ शकते. म्हणजे, सीट बाजूला काढल्यानंतर त्या सायकलचा काही उपयोग राहत नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सीट बाजूला काढल्यावर त्या सायकल नेहमीप्रमाणे वापरताच येऊ शकत नाही. सीट नसेल, तर ती सायकल चालूही शकणार नाही.

या तंत्रज्ञानाला त्यांनी येरका असे नाव दिले आहे. हे येरका तंत्रज्ञान तोडल्याशिवाय सायकल अनलॉक होणार नाही आणि अशा प्रकारे सायकलची मोडतोड झाली, तर त्याची काही किंमतही राहणार नाही. अशा तंत्रज्ञानाची ही सायकल खर्‍या अर्थाने चोरी न होणारी सायकल असेल, असा त्या निर्मात्यांचा दावा आहे.

त्या तिघांनी या सायकलच्या अनोख्या मॉडेलच्या पेटंटसाठीही अर्ज केला आहे. लंडनमध्येही सायकल चोरीला आळा घालण्यासाठी फोल्डिंगच्या सायकल बाजारात आणण्यात आल्या आहेत. म्हणजे, ऑफिसला सायकलने गेलात, की सायकल फोल्ड करून आपल्या डेस्कपर्यंंतही ती घेऊन जाता येऊ शकेल.

चिलीमध्ये सायकल चोरीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांनी हा मार्ग शोधून काढला. जगभरात सायकल वापरासाठी इतके वेगवेगळे मार्ग शोधून काढले जात आहेत; आपणही त्यात सहभागी होऊन सायकल वापराचे प्रमाण वापरले, तर आपल्या प्रकृतीसाठीही ते चांगले असू शकेल.

Deshdoot
www.deshdoot.com