Thursday, April 25, 2024
Homeनगरशेतकरी कर्जमाफीचे ‘आधार प्रामाणिकरण’ यशस्वी

शेतकरी कर्जमाफीचे ‘आधार प्रामाणिकरण’ यशस्वी

सहकार विभागाने नगरसह राज्यातील पाच जिल्ह्यात राबविला पायलट प्रयोग

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी ऑडीट झालेल्या 3 लाख शेतकर्‍यांची नावे राज्य सरकारच्या संकेत स्थळावर टाकण्यात आली आहेत. या नावांचे राज्यातील पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर आधार प्रमाणिकरण करण्यात आले. यात नगर जिल्ह्याचा समावेश होता. गुरूवारी संगमनेर तालुक्यातील राजापूर तालुक्यात हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला.

- Advertisement -

राज्यातील अहमदनगर, अमरावती, नंदूरबार, गडचिरोली आणि पुणे जिल्ह्यात कर्जमाफीसाठी ऑडीट होवून संकेतस्थळावर टाकण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या नावांचे गुरूवारी प्रयोगिकतत्वावर प्रामाणिक करण्यात आले. यात संबंधीत शेतकर्‍यांचा आधार क्रमांक बरोबर आहे? आधार नंबरवर लिंक असणार्‍या मोबाईलवर शेतकर्‍यांना ओटीपी नंबर योग्यरित्या येतो की नाही, यासह आधार क्रमांकानूसार संबंधीत शेतकर्‍यांची बँकेतील कर्ज खात्याचा तपशील योग्य आहे की नाही याची खात्री करण्यात आली.

संगमनेर तालुक्यातील राजापूर या गावात शेतकर्‍यांना एकत्रित करून आधार प्रामाणिकरणाचा प्रयोग करण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम, जिल्हा बँके सीईओ रावसाहेब वर्पे आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील आधार प्रमाणिककरण यशस्वी झाल्याने 21 तारखेला जाहीर होणार्‍या कर्जमाफीच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा समावेश होणार आहे. सहकार विभागाने गुरूवारी ही मोहिम नगरसह अमरावती, नंदूरबार, गडचिरोली आणि पुणे जिल्ह्यात राबविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या