वीज चोरी करणार्‍या 76 जणांविरुद्ध कारवाई
Featured

वीज चोरी करणार्‍या 76 जणांविरुद्ध कारवाई

Sarvmat Digital

नेवासा शहर, करजगाव, प्रवरासंगम, कुकाणा, सलबतपूर येथून विजेचे साहित्य जप्त

नेवासा (तालुका वार्ताहार) – नेवासा शहरासह तालुक्यात वीज चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण नेवाशाच्या वतीने शुक्रवारी सकाळपासून कारवाईची मोहीम हाती घेऊन नेवासा तालुक्यातील नेवासा शहर, करजगाव, प्रवरासंगम, कुकाणा, सलबतपूर या गावात आकडे टाकून व मीटर मध्ये घोटाळा करून वीज चोरी करणार्‍या 76 जणांविरुद्ध कारवाई केली.

आकडे टाकून वीज घेतल्यामुळे हमखास रोहित्रात बिघाड होतात परिणामी वीज चोरी करणार्‍यांमुळे मीटर असलेल्या ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. एकदा रोहित्र बिघडले की 15-15 दिवस गावे अंधारात राहतात. यामुळे नेवासा महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगळे व कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

या धडक कारवाईमुळे महावितरणला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होऊन वीज गळती देखील कमी होणार आहे. यापुढे ही मोहीम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वीज चोरी करणार्‍यांविरोधात 135 कलमान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांनी सांगितले.

या कारवाईच्यावेळी उपकार्यकारी अभियंता शरद चेचर, सहा. अभियंता मनोहर पाटील, शेजुळे, वाघ, दुधे, विजयसिंग पाटील, आरीफ शेख, उपळकर, रवी कांबळे, महेश पाटील, मते, पेढे, कुर्‍हाट, हरी येले, आचारी, फोडसे आदी कर्मचारी उपस्थित होते.

गावाचे नाव    मीटर    चोरी आकडे
नेवासा शहर    1             05
करजगाव      31             04
कुकाणा        00             08
प्रवरासंगम     00             22
सलबतपूर      00              5

Deshdoot
www.deshdoot.com