Featured

धुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

सध्या कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने याबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे या पोटनिवडणुकीला मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी  भारत निवडणूक आयोगाकडे पाठवला होता.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने  ही पोट निवडणूक ही अधिसूचना निर्गमित झाल्यापासून 60 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com