दुर्गापूरच्या दुचाकी चोरांना लोणी येथे पकडले; तीन दुचाकी हस्तगत
Featured

दुर्गापूरच्या दुचाकी चोरांना लोणी येथे पकडले; तीन दुचाकी हस्तगत

Sarvmat Digital

लोणी (वार्ताहर) – दुचाकी चोर्‍यांनी चिंतेत पडलेल्या नागरिकांना लोणी पोलिसांच्या सतर्कतेमुळे काहीसा दिलासा मिळाला असून राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील दोघांना दुचाकी चोरीत पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत केल्या.

गेल्या काही महिन्यांपासून लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध चोर्‍यांबरोबरच दुचाकी चोर्‍यांनी नागरिक परेशान होते. लोणी पोलिसांच्या सतर्कतेमुळे आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून विना क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीवरून जाणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते दुचाकी चोर असल्याचे निष्पन्न झाले.

धनंजय सुधाकर बोरसे व लहू काशीनाथ सोनवणे (दोघे रा. दुर्गापूर) यांनी चोरीची कबुली देताना आणखी दोन डिस्कव्हर व स्प्लेंडर दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. त्या दुर्गापूर येथूनच त्यांनी चोरल्या होत्या. पोलिसांनी 93/2019, भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दुचाकी चोरांना जेरबंद करण्यात स. पो. नि. प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एन. बी. सूर्यवंशी, कर्मचारी लबडे, जायभाय, भिंगारदिवे, दहीफळे, सनानसे, शेख, कुसळकर यांनी योगदान दिले.

Deshdoot
www.deshdoot.com