Saturday, April 27, 2024
HomeUncategorized२४ तासांच्या आत दरोडेखोर जेरबंद

२४ तासांच्या आत दरोडेखोर जेरबंद

धुळे  –

तालुक्यातील नगाव शिवारातील शेतातील पाटील ट्रान्समिशन वर्ल्ड कंपनीच्या गोडाऊनमधील दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासांच्या आत उघडकीस आणला आहे. टोळीतील दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या अ‍ॅल्युमिनीयम तारेसह गुन्ह्यात वापरलेली पिकअप वाहन असा एकुण 4 लाख 60 हजार 660 रूपयांचा मुद्येमाल हस्तगत केला आहे. दोघांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.

- Advertisement -

मुंबई-आग्रा महामार्गावरील नगाव शिवारातील दिनकर रघुनाथ पाटील (रा. कापडणे) यांच्या मालकीच्या पाटील ट्रान्समिशन वर्ल्ड कंपनीच्या गोडाऊनवर काल मध्यरात्री सात ते आठ जणांनी दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी वॉचमन व जवळील हॉटेलवरील कामगारांना मारहाण करून त्यांना एका खोलीत बांधुन गोडावूनमधील 1 लाख 82 हजार 400 रूपये किंमतीची अल्युमिनीयम तारचे बंडले जबरीने वाहनात टाकून चोरून नेले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती.

त्यादरम्यान गुन्ह्यात वापरलेले वाहनाचे मालासह आ.के.वे. ब्रिज, धुळे येथे वजन करण्यात आले, अशी माहिती मिळाली, अधिक तपासात पिकअप वाहनाचे (क्र. एमएच 01 एपी 2104) सकाळी वजन करण्यात आले असून वाहनासोबत रिझवान शेख रहिम (रा. अजमेरानगर, धुळे) होता., अशी माहिती मिळाली. तो लळिंग गावत असल्याचे समजल्यानंतर एलसीबीच्या पथकाने त्याला गावात पाठलाग करुन ताब्यात घेतले.

त्यानंतर पथकाने इम्रान खान नुरखान पठाण (रा मोलविगंज, धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी इतर 7 ते 8 साथिदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेल 2 लाख 60 हजार 680 रूपये किमंतीची अ‍ॅल्युमिनिय तार तसेच गुन्हयात वापरलेले 2 लाख रूपये किंमतीचे पिकअप वाहन असा एकुण 4 लाख 60 हजार 680 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांना मुद्देमालासह देवपुर पश्चिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत तसेच सहा. फौजदार नथ्थु भामरे, पोना कुणाल पानपाटील, उमेश पवार, पोकाँ रविकिरण राठोड, विशाल पाटील, पोहेकॉ संजय पाटील, पोकॉ केतन पाटील यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या