धुळे : प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या
Featured

धुळे : प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

Balvant Gaikwad

तालुक्यातील मेहेरगाव येथील रहिवासी व श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.डॉ. योगेश झुलाल भामरे यांनी आज सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केली.

डॉ. भामरे यांनी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास शेतात गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविली. कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.

त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. रात्री 8 वाजेनंतर मेहेरगावात त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रा.डॉ. भामरे हे अभ्यासू व मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता. ते एकूलते एक होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने गावकर्‍यांचा अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com