Wednesday, April 24, 2024
Homeधुळेधुळे : मालमत्ता कर भरण्यासाठी नवीन ॲप विकसित

धुळे : मालमत्ता कर भरण्यासाठी नवीन ॲप विकसित

महापालिकेची मोबाईल गर्व्हनन्सकडे वाटचाल

धुळे | प्रतिनिधी

- Advertisement -

महापलिकेत ई गर्व्हनन्स अंतर्गत विविध संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून महापालिकेतील कार्यप्रणाली पारदर्शकता व गतिमानता यावी या दृष्टिकानातून विविध नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून मालमत्ता कर भरणे सुलभ व्हावे यासाठी मालमत्ताकर विभागाकरिता धुळे ई कनेक्ट हे नवीन ॲप धुळे महापालिके मार्फत असेन्टेक या कंपनीच्या सहकार्याने विकसीत करण्यात आले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या मोबाइल गव्हर्नन्स या धोरणा अंतर्गत हे ऍप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वार मालमत्ता कराची संपूर्ण माहिती बघता येणार आहे. तसेच याद्वारे आपल्या मालमत्ता कराचा भरणा देखील नागरिकांना घरबसल्या करता येणार आहे.

मालमत्ता कर भरल्यानंतर त्याची पावती लगेचच ॲपद्वारे डाऊनलोड करून मालमत्ताधारकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे या कार्यप्रणालीत पारदर्शकता व सुलभता येणार असून नागरिकांसाठी हे ॲप गरजेचे व अत्यावश्यक ठरणार आहे.

नागरिकांना हे ॲप गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून ॲन्ड्राईड मोबाईद्वारा डाऊनलोड करता येणार आहे. या ॲपच वैशिष्ट्य म्हणजे या ॲपद्वारे नागरीकांनी केलेला कराचा भरणा हा संपूर्णत: सुरक्षित राहणार आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांना त्यांच्या स्वतःचा ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक अत्यावश्यक आहे. ॲपमध्ये आपला मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी क्रमांक नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होईल.

सदर ओटीपी क्रमांक अॅपमध्ये टाकल्यावर पडताळणी हाऊन आपल ॲप हे कार्यान्वित होऊ शकणार आहे. त्याव्दारे नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर आपल्या संपूर्ण मालमत्तेच्या कराची माहिती, थकबाकी इत्यादीबाबत माहिती उपलब्ध होणार आहे.

यासाठी नागरिकांना महापालिका कार्यालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासणार नाही, महापालिकेने नागरिकांच्या हितासाठी सदर ॲप विकसित केलेले असून याची सुरुवात दि.१३ डिसेंबर पासून करण्यात येत आहे. दरम्यान सदर ॲपचे उदघाटन दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजित आज शेख यांच्या उपस्थितीत झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या