कोरोना : धुळ्यात “मॉर्निंग वॉक करणाऱ्या 23 जणांवर गुन्हा
Featured

कोरोना : धुळ्यात “मॉर्निंग वॉक करणाऱ्या 23 जणांवर गुन्हा

Balvant Gaikwad

देशभरात लॉक डाउन असताना आणि घरातून बाहेर न पडण्याच्या सक्त सूचना असताना आज पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात सर्वत्र भादवि 144 अर्थात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शिवाय अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तरीही सकाळी काही नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडल्याचे आढळून आले. त्यामुळे नदीकाठावरील शिवाजी रोड, आयकर भवन, जमानागिरी रोड या भट फिरणाऱ्या नागरिकांना पकडून शहर पोलीस ठाण्यांत आणण्यात आले. त्यांच्या विरुद्ध कलम 144 चे उल्लंघन केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Deshdoot
www.deshdoot.com