धुळे : आणखी तीन करोना पॉझिटिव्ह आढळले
Featured

धुळे : आणखी तीन करोना पॉझिटिव्ह आढळले

Balvant Gaikwad

शिरपूरात एका वृध्देचा मृत्यू; जिल्ह्यात 167 बाधित

जिल्हा रुग्णालयाने मंगळवारी सकाळी दिलेल्या अहवालानुसार धुळे शहरात आणखी तीन कोरोना बाधीत आढळून आले. त्यात दोन पुरुषांसह एका तरुणीचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 167 झाली आहे. तर शहरात 107 बाधीत आहेत.

शहरात तीन जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यात फिरदोसनगर येथील 68 वर्षीय पुरुष, जामचा मळा येथील 19 वर्षीय तरुण व भावसार कॉलनी येथील 24 वर्षीय महिलेचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 87 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली आहे.

शिरपूर तालुक्यात 39 कोरोना बाधित आढळून आले आहेत. मंगळवारी शिरपूरातील वाल्मिक नगरमधील 60 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच झाली असून जिल्ह्यात ही संख्या 20 झाली आहे. साक्री तालुक्यात दहा, शिंदखेडा तालुक्यात नऊ कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com