धक्कादायक : दोंडाईचा येथील मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह
Featured

धक्कादायक : दोंडाईचा येथील मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

Gaurav Pardeshi

धुळे :

धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. दरम्यान, दोंडाईचा येथील स्टेशन भाग परिसरातील एका पस्तीस वर्षीय पुरुषाला धुळे येथे संशयित कोरोना रुग्ण म्हणून उपचारासाठी दाखल केले होते.

त्याचा दि. ९ रोजी दुपारी १२ वाजेला उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मात्र त्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला व त्यात तो मृत व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने दोंडाईच्यात कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे, दिवसेंदिवस रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले  आहे.

दोंडाईचात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोळा वर गेली असल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com