जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांची बदली
Featured

जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांची बदली

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जिल्हाधिकारी म्हणून वर्षभराचा कालावधीही पूर्ण होत नाही तोच गंगाथरन डी. यांची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन मंत्रालयाने दिले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सुभाष इंगळे यांच्या स्वाक्षरीने निघालेला आदेश काल सायंकाळी याठिकाणी येवून धडकला. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या बदलीची चर्चा वार्‍यासारखी पसरली. अर्थात जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे आणि जिल्हाधिकारी यांची बदली होईल असे यापुर्वीच बोलले जात होते.

15 दिवसांपुर्वी पोलिस अधीक्षकांची बदली झाल्यानंतर आज जिल्हाधिकार्‍यांनाही या पदावरुन अन्यत्र हलविण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता वसई विरार महापालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी तातडीने नवीन पदभार स्विकारावा असे आदेशात म्हटले आहे.

तर नाशिक विभागीय आयुक्तांच्या सल्याने जिल्हाधिकारी पदाची धुरा अन्य अधिकार्‍यांवर सोपवावी असेही नमूद केले आहे. आता जिल्हाधिकारी म्हणून कुणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com