धुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची शंभरी पार ; बाधित रुग्ण झाले १०९
Featured

धुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची शंभरी पार ; बाधित रुग्ण झाले १०९

Rajendra Patil

शुक्रवारी रात्री २० तर आज पुन्हा सात रुग्णांची भर, बाधित रुग्ण १०९

धुळे |  प्रतिनिधी
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव आटोक्यात असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण होत असतांनाच शुक्रवारी रात्री एकाच दिवशी २० बाधितांची वाढ झाली.

तर आज पुन्हा सात रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १०९ झाली आहे. बाधितांमध्ये तब्बल ८० रुग्ण हे धुळे शहरातील आहे. यात बिलाडी रोडवरील एका नऊ वर्षीय बालिकेचाही समावेश आहे.

आज दुपारी प्रलंबित अहवालांपैकी ८० रुग्णांचे २१ रिपोर्ट प्राप्त झाले. त्यात शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील तीन रुग्ण बाधित आढळूले असून यात २५, ६५ व ७५ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. सायंकाळी पुन्हा सात रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यात चार जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

कोरोनाबाबत सर्वतोपरी प्रतिबंधात्मक उपाय होत असतांना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणि नागरिकांच्या छातीत धडधड देखील वाढते आहे. आतापर्यंत ५७ रुग्ण बरे होवून घरी गेल्याचे समाधान व्यक्त होत असतांनाच बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

शुक्रवारी रात्री आढळून आलेल्या २० रुग्णांमध्ये वाडी शेवाडीचे दोन, बल्हाणेचे दोन व शिरुड येथील एक रुग्ण वगळता उर्वरीत १५ रुग्ण शहरातील असल्याचे जिल्हा रुग्णालयाचे नोडल ऑफिसर डॉ. विशाल पाटील यांनी कळविले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com