Featured

अमरिशभाई, अभिजित पाटील यांच्यात लढत

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज माघारीच्या शेवटच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतली. माघारीअंती भाजपाचे अमरीशभाई पटेल व काँग्रेसचे अभिजित पाटील यांच्यात समोरा-समोर लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता दोन्ही उमेदवारांनी राजकीय डावपेच खेळण्यास सुरूवात केली आहे.

धुळे व नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आमदार निवडून जाणार आहे. त्यासाठी एकुण सात जणांनी 13 अर्ज दाखल केलेे होते. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. तर आज दि. 16 रोजी माघारीची अंतिम मुदत होती.

त्यात आज शामकांत रघुनाथ सनेर, अमृत दलपत लोहार, ज्ञानेश्वर गोविंद नागरे, भुपेशभाई रसिकलाल पटेल, प्रकाश त्र्यंबक पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचे अमरीशभाई रसिकलाल पटेल व इंडियन नॅशनल काँग्रेसचे अभिजित मोतीलाल पाटील हे रिंगणात असून त्यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com