धुळे : दुचाकी व ट्रक अपघातात दोन ठार ; एक जखमी

धुळे : दुचाकी व ट्रक अपघातात दोन ठार ; एक जखमी

साक्री (प्रतिनिधी) –

तालुक्यातील शेणपूर फाट्यावर मोटारसायकल आणि ट्रकमधे अपघात होऊन दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असुन जखमीवर साक्री ग्रामीण रुणालयात उपचार करण्यात येत आहेत.

आज दि.30 रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पिंपळनेरहून साक्रीकडे येणारी ट्रक क्र. MH 10 AW 7307 आणि साक्रीकडून पिंपळनेरकडे जाणारी  मोटारसायकल क्र. MH.18.AM 6592 यांच्यात जोरदार धडक होऊन योगेश आप्पा गरदरे, अजय भटू कोरडकर, रा.गंगापूर हे दोन जण जागीच ठार झाले असुन विलास
तान्हू कारंडे रा.गंगापूर हा गंभीर जखमी झाला आहे.

पिंपळनेर येथील खाजगी अँम्बूलन्सने मयत आणि जखमीस साक्री ग्रामीण रुणालयात दाखल केले असता डॉ.श्रीकांत पाटील यांनी जखमीवर उपचार केले. तर  योगेश गरदरे आणि अजय कोरडकर यांना वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी.गोयल यांनी तपासुन मयत घोषित केले. साक्री ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

ट्रक चालक वाहन सोडून पळ काढत पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाऊन अपघाताची माहिती दिली. मात्र घटना ही साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पिंपळनेर पोलिसांनी साक्री पोलीस ठाण्यात ळवल्याने घटनास्थळी पो.हे.काँ अशोक पाटील, महेश जाधव , विजय पाटील, बागुल, पोलीस वाहन चालक विशाल परदेशी पोहचवून पंचनामा  केला. याबाबत साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com