मूळ राहुरीच्या अल्पवयीन मुलीवर कोपरगावात अत्याचार
Featured

मूळ राहुरीच्या अल्पवयीन मुलीवर कोपरगावात अत्याचार

Sarvmat Digital

पारेगाव खुर्दच्या तरुणास अटक

तळेगाव दिघे (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेत बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ ( वय 21 वर्षे, रा. पारेगाव खुर्द ) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

मुळच्या मुळानगर ता. राहुरी येथील रहिवाशी असलेल्या व सध्या तळेगाव दिघे येथे मोलमजुरीच्या निमित्ताने राहणार्‍या एका महिलेची अल्पवयीन मुलगी दि. 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शौचास जाते असे सांगून घरातून बाहेर गेली, ती पुन्हा घरी परतली नव्हती. कुणीतरी आपल्या मुलीस पळवून नेल्याच्या आईच्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.

दरम्यान, पीडित मुलीने तिच्या आई व मामा समवेत येऊन सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ ( वय 21 वर्षे, रा. पारेगाव खुर्द ) याने आपणास ‘तू जर माझेशी लग्न केले नाहीतर मी जीव देईन.’ अशी आईच्या मोबाईलवर धमकी देत पळवून नेले. दि. 12 डिसेंबर ते दि. 15 डिसेंबर 2019 या काळात बळजबरीने अत्याचार केल्याचा जबाब पोलिसांना दिला. आरोपी मोकळ याने या मुलीस ठाणे येथील त्याचे खोलीवर नेऊन तसेच कोपरगाव येथे मित्राच्या मेव्हण्याच्या घरी नेत, स्वतःच्या हातावर चाकूने मारून घेऊन बळजबरीने अत्याचार केल्याचा जबाब पीडित मुलीने नोंदविला.

त्यानुसार दाखल गुन्ह्यात भादंवि 366 (अ), 376 (2), (एन) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 4 व 6 प्रमाणे वाढीव कलम नोंदविले. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com