नगर: तोफखान्यात मित्रांची फाईटींग
Featured

नगर: तोफखान्यात मित्रांची फाईटींग

Sarvmat Digital

चाकू हल्ल्यात एक जखमी

अहमदनगर (प्रतिनिधी) – मोटारसायकलची चावी मागितल्याच्या कारणातून दोघा मित्रांमध्येच तोफखान्यात फाईटींग झाली. संतापाच्या भरात एकाने दुसर्‍यावर चाकू हल्ला केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेचा गुन्हा आज पोलिसांत दाखल झाला.

मोहित परदेशी (पूर्ण नाव माहित नाही) असे चाकू हल्ला करणार्‍या आरोपी मित्राचे नाव असून त्याच्याविरोधात खुनी हल्ला व मारहाण या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिपक देवानंद ताडला (रा.दातरंगेमळा) असे जखमी झालेल्या दुसर्‍या मित्राचे नाव आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तोफखाना परिसरातील शितळा देवी मंदिर परिसरात ही घटना घडली. ताडला हा दुचाकी घेऊन मंदिरासमोर थांबला होता. तेथे आलेल्या परदेशी याने दुचाकीची खिशात ठेवलेली चावी मागितली. चावी दे असे म्हणत ताडला याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

संतापाच्याभरात परदेशी याने ताडलाच्या अंगावर चाकूचे सपासप वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोसई घायवट करत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com